Breaking News

नंदोरी बस स्थानका जवळ कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक

कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक
कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक
मोठी दुर्घटना टाळली
वरोरा-

वेल्डिंग च्या दुकानाचे दीड लाखाचे नुकसान
वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानका जवळ भरधाव वेगात येत असलेल्या कॅप्सूल टँकरने डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल्स ला धडक देत दुभाजक ओलांडून वेल्डिंग च्या दुकानात घुसले यात वेल्डिंग दुकानाचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले . वेल्डिंग
 दुकानातील कामगारांनी तत्परता दाखवीत पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

प्राप्त माहिती नुसार चंद्रपूर वरून नागपूर कडे जाणारे कॅप्सूल टँकर क्रमांक MH04 M 7959 हे भरधाव वेगात येत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून चंद्रपूर वरून नागपूर कडे जाणाऱ्या डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल ला धडक देत थेट दुभाजक ओलांडून थेट उमरे वेल्डिंग वर्क शॉप मध्ये घुसले वेल्डिंग वर्क शॉप मध्ये चार कामगार काम करीत होते मात्र कामगारांनी तत्परता दाखवीत तिथून पळ काढल्याने सुदयवाने मोठी दुर्घटना होण्यापासून टळली
यात मात्र वेल्डिंग वर्कशॉप चे मालक किशोर उमरे यांचे एक लाख पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले असून डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल्स चेही मोठे नुकसान झाले आहे
कॅप्सूल टँकर चालक राहुल गौतम वाघमारे (45) रा घुटकाला वॉर्ड चंद्रपूर याला वरोरा पोलिसांनी अटक केली  आरोपी वर कलम 279-427 भादंवि सह कलम 184 / 185 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *