कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे

कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे
शरदराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न.
*गडचांदूर-     कोरोनाआणि जागतिक इतिहासाचे संदर्भ लक्षात घेता कोरोना महामारी चा सामाजिक आर्थिक व राजकीय परिणाम संपूर्ण मानवजातीवर झाला असून मनुष्याचे जनजीवन   विस्कळीत झाले आहे.कोरोना काळामध्ये सर्वस्तरावर प्रचंड  आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचे रोजगार गेले. मजुरांचे स्थलांतर झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक बदल होऊन मनुष्याचे जीवन असुरक्षित झाले.मात्र भारतीय पारंपरिक संस्कार आणि संस्कृती न विसरता ग्रामीण भागातील लोकांनी या संकटाच्या काळामध्ये गाव खेड्यांमध्ये एकमेकांना मदत करून या कोरोना संकटाचा मुकाबला मोठ्या हिमतीने केला.राजकीय क्षेत्रामध्ये विविध पक्षांनी कोरोना काळातही एकमेकांवर टीका केली. मात्र नंतरच्या काळात एकत्र येऊन लढा दिला ही महत्त्वाची बाब नोंदवली पाहिजे. गत इतिहासाचा आलेख लक्षात घेता भारतात आणि जगामध्ये अनेक प्रकारच्या महामारी येऊन गेल्या मात्र माणसाने यावर मात करून आपले जीवन सुरक्षित ठेवले . मानव जसा निसर्ग संस्कृतीपासून दूर जाईल तसतसे अनेक संकटे येतील म्हणून मानवाने निसर्गाच्या नियमाचे एक रूप राहून रक्षण व पालन करून एकत्रितपणे लढा दिला पाहिजे तरच मानव जीवन सुखी होईल असे प्रतिपादन हैदराबाद येथील दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्राचे संचालक भुजंगराव बोबडे यांनी याप्रसंगी केले आहे
गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाच्या इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने व हैदराबाद येथील दख्खन पुरातत्त्व सांस्कृतिक संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने “कोरोना व जागतिक इतिहासाचे संदर्भ:सामाजिक, राजकीय व आर्थिक”या विषयावर ऑनलाइन एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आलेला होता या वेबिनार चे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह याप्रसंगी उपस्थित होते अध्यक्षीय भाषणातून डॉ. सिंह यांनी कोरोनाचा भारतीय व्यवस्थेवर झालेला सामाजिक,आर्थिक व राजकीय परिणाम याप्रसंगी विशद केला. प्रास्ताविकातून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय गोरे यांनी  वेबिनारच्या आयोजनाची भूमिका विशद करून कार्यक्रमातील तज्ञ मार्गदर्शक भुजंग बोबडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिला या वेबिनार मध्ये 13 राज्यातील 200 च्या वर प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते. या वेबिनारचे संचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.शरद बेलोरकर यांनी केले व वेबिनार ची भूमिका विशद केली.या वेबिनरच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *