जिजाऊ योजनेच्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहा- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे

जिजाऊ योजनेच्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहा- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे

चंद्रपूर, दि. 15 मार्च : दिनांक 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, अशा घरातील प्रत्येक विधवा महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता / जिजाऊ या योजनेअंतर्गत रुपये 50 हजार लाभ मिळतील अशी खोटी माहिती सोशल मिडियावर पसरत असल्याचे निदर्शनात आले आहे. ही माहिती पुर्णत: खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित नाही. या संदेशामुळे नागरिकांची फसवणुक होण्याची शक्यता असून नागरिकांनी या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *