Breaking News

सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी

Advertisements

सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी
देवळी,
कोरोना निर्बंध पूर्णपणे शिथिल केले असल्याचा गैरसमज होऊन दुसर्‍याही दिवशी देवळीकरांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी करीत आपल्या गैर जबाबदारीचे प्रदर्शन केले. नागरिकांसह दुकानदारांनीही कोरोनासंदर्भातील सर्व नियम ढाब्यावर बसवले असून घरातील सर्व साहित्य संपल्यागत बाजारपेठेत गर्दी केली.

Advertisements

जिल्हा प्रशासनाने संचारबंदीमध्ये किंचित सवलत दिली. त्याचा गैरफायदा करीत देवळीतील नागरिकांनी सलग दुसर्‍या दिवशीही प्रचंड गर्दी केल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना बाधितांच्या संख्येत वर्धेनंतर देवळी आघाडीवर होते. कोरोनाची भीषण स्थिती स्वतःच्या डोळ्याने अनुभवून सुद्धा शहरातील नागरिक असे वागत असतील तर प्रशासनाने तरी काय करायला हवे हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांनी जवाबदारीने वागून सर्व शासकीय नियमाचे पालन करने अत्यावश्यक असल्याचे मत काही सुज्ञांनी व्यक्त केले.

Advertisements

 

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *