Breaking News

म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा – राज्यमंत्री तनपुरे

Advertisements

म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा  – राज्यमंत्री तनपुरे

Advertisements

चंद्रपूर,दि.3 जून : कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत 81 नागरिकांमध्ये या आजारची लक्षणे आढळून आली  असून यापैकी 26 जण बरे झाले आहेत. कोविड मधून बरे झालेले किंवा मधूमेह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून आरोग्य यंत्रणेने या आजाराचे त्वरीत निदान करावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

Advertisements

उर्जानगर येथील हिराई विश्रामगृहात कोविड संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार सचिन खंडाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे आदी उपस्थित होते.

म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ‘ॲम्पोटेरेसीन बी’ या इंजेक्शनची उपलब्धता लवकरच सुरळीत होईल, असे सांगून राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करतांनाच म्युकरमायकोसीसच्या लक्षणांकडेही लक्ष द्या. तसेच अनियंत्रीत मधूमेह असणाऱ्या रुग्णांची माहिती घ्या. यावेळी राज्यमंत्र्यांनी मनपाच्या नवीन रुग्णालयाची परिस्थिती, जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्ण, महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या, सीसीसी, डीसीएच, डीसीएचसी, आयसीयु व रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता आदींचा आढावा घेतला.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर होने लगेगा!

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *