Advertisements
ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल*
शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना मार्गदर्शन करण्याकरिता ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली असून अंबादेवी वार्ड येथे कंपनीच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 10 जून 2021रोजी श्री विठ्ठल राव सोनेकर माजी प्राचार्य लोया माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरोरा यांच्या हस्ते करण्यात आले
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून अधिकाधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील युवकांनी एकत्रित येत सदर कंपनीची स्थापना केलेली असून प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडण्यात येईल असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप सोनेकर यांनी सांगितले.
उत्पादक कंपनी च्या सदस्यांना कृषी विषयक मार्गदर्शन यासोबतच योग्य दरातील निविष्ठांचा पुरवठा , कृषी विषयक हवामान अंदाज , कुटुंबातील सदस्यांना माफक दरात संगणक प्रशिक्षण तसेच सभासद शेतकऱ्यांच्या आयुर्विमा इत्यादी सुविधा पुरविण्यात येईल असे कंपनीचे संचालक श्री चंद्रशेखर झाडे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
कंपनी कार्यालयाचे उदघाटन कोरोना च्या नियमांचे पालन करीत श्री किशोर डोंगरकर , श्री उल्हास बोडे , सौ भारती भांडारकर , श्री नितीन आडे , श्री . प्रशांत काकडे ,अँड. विजय पावडे , श्री . अभय पारखी ,श्री राहुल तायडे , श्री . हर्षद घोडिले तथा तालुक्यातील शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
Advertisements