राष्ट्रवादी काँग्रेस चा केंद्र शासनाच्या इंधन दरवाढी विरोधात हल्लाबोल.
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील भद्रावती टप्प्यावर केले निदर्शने.
देशातील जनतेला महागाई पासुन मुक्त करूण इंधन दरवाढ तसेच घरगुती गॅस याच्या वर वाढलेल्या किंमती तत्काळ मागे घ्याव्या तसेच रसायनीक खतावर वाढलेले दर कमी करूण शेतकरी बांधवयांना दिलासा द्यावा या मागण्या राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
हे निदर्शने आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रेदश प्रतिनिधी मुनाज शेख, २ा.का.तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर,यांच्या नेतृत्वात देन्यात आले.या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड.युवराज धानोरकर,शहर अध्यक्ष सुनिल महाले,असंघटीत कामगार जिल्हा अध्यक्ष फयाज शेख ,महीला शहर अध्यक्ष शबिया देवगडे,महीला अध्यक्ष तालुका दुर्ग बिश्वास,महीला असंघटीत जिल्हा अध्यक्ष शाहीस्ता खान,युवक तालुका अध्यक्ष स्वपनिल लांबट, माजी पस सभापती धनराज विरूटकर,संजय आस्वले,रोहीत वाबिटकर ,युवक शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, रवी नागपुरे,पणवेल शेंडे, संदीप चौधरी, रोशन कोमरेड्डीवार,साहील देवगडे, कुणाल मेंढे, निलेश जगताप,प्रमोद वावरे, आशिष लिपटे इत्यादींची उपस्थिती होती.