Breaking News

ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्रयत्न : खासदार कृपाल तुमानेंचा गौप्यस्फोट

विश्व भारत ऑनलाईन :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचले. शिंदेंनी केलेले बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरले.पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला.

दसऱ्याच्या मुहूर्तावर २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केलाय. कृपाल तुमाने हे नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी निमित्त आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी तुमाने यांनी हा दावा केलाय.

तुमाने म्हणाले, शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार मुंबईचा असेल, तर दुसरा खासदार मराठवाड्यातील असू शकतो, अससे तुमानेंनी म्हटलंय. त्यामुळे शिंदेंच्या मेळाव्यात कोण प्रवेश करणार याकडे सगळ्यांची नजर असणार आहे.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणितात कच्चे : म्हणाले…!

राजकीय चाणक्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख होती. परंतु अलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *