Breaking News

बाबुंना पाहिजे चहापाण्याचा खर्च, पत्नीपेक्षा अधिकाऱ्यांचे फाईलवर जास्त प्रेम – नितीन गडकरींची टीका

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
एक फाईल पुढे सरकायला दीड वर्ष लागतात. प्रत्येक टेबलवरील शासकीय बाबू चहापाण्याचा खर्च मागतो. आर्थिक व्यवहाराशिवाय काम होतच नाही. शासकीय कामात वेळेचे पालनच होत नाही, असे रोखठोक मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. ते नागपुरात बोलत होते.काही अधिकारी पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात. वनविभागाकडे विकासकामाशी संबंधित 17 प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकायला पाहिजे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर गडकरी म्हणाले. तर, काही आमदार-खासदार स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. त्यांच्यामुळे विकास कामे थांबली आहेत, अशी टीकाही गडकरी यांनी केली.

Advertisements

संपादन आणि अभयारण्य

Advertisements

नागपूरजवळील उमरेड कऱ्हाडला अभयारण्याच्या नावाखाली वनविभागाने खाण बंद केली. तर, एखादी खाण सुरु करताना भूसंपादनासाठी प्रचंड वेळ लागतो. सध्या भूसंपादन करताना खंडणीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे राज्याचा विकास थांबला आहे. याकडे आपण सक्षम मंत्री म्हणून लक्ष द्यावे, असे गडकरी मुनगंटीवार यांना म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

RSS ने शुरू कर दी मोदी सरकार की खाम‍ियों की ग‍िनती?

RSS ने शुरू कर दी मोदी सरकार की खाम‍ियों की ग‍िनती?   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

CM शिंदे का चेहरा मुरझाया!NDAनहीं लड़ेगी चुनाव?

CM शिंदे का चेहरा मुरझाया!NDAनहीं लड़ेगी चुनाव?   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *