Breaking News

भाजप चिंतेत?: नागपूर जिल्हा परिषदेवर सुनील केदारांचे वर्चस्व

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

सर्वांचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत माजी मंत्री सुनील केदार गटाच्या मुक्ता कोकर्डे या अध्यक्षपदी निवडून आल्या. भाजपलाही सुनील केदार यांचे वर्चस्व रोखण्यात यश आलेले नाही. परिणामी, भाजपसाठी ही बाब चिंतेची ठरली आहे. यातून सुनील केदारांची ग्रामीणमध्ये पकड किती मजबूत आहे याची प्रचिती आली. शिवाय केदारांना टाळून राजकारण करता येणार नाही, असा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये गेला.

Advertisements

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांता कुमरे, मुक्ता कोकर्डे व देवानंद कोहळे यांची तर उपाध्यक्षपदासाठी सुमित्रा कुंभारे, मनोहर सव्वालाखे यांची नावे चर्चेत होती. उपाध्यक्षपदासाठी कुंदा राऊत यांचे नाव आले. त्यांचे वडील श्यामदेव राऊत हे जि. प. चे अध्यक्ष होते. सर्व गटांना चालणाऱ्या असल्याने त्यांचे नाव समोर आले.

सत्ताधारी काँग्रेसकडे बहुमत असले तरी एक गट नाराज असल्याने पक्षात धाकधूक होती. मात्र, हे बंड वेळीच मोडीत निघाल्याने बंडाळी टळली. अध्यक्षांना 39, उपाध्यक्षांना 38 मते मिळाली. तर बंडखोर नाना कंभाले यांनी उभे केलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला 18 तर उपाध्यक्षाला 19 मते मिळाली.

58 सदस्यीय जिल्हा परिषदेत 33 सदस्यीय काँग्रेसकडे बहुमत आहे. 14 जागा भाजपकडे तर 8 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेसनेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटाचे जि.प. वर वर्चस्व असून सध्या त्यांच्या गटाच्या रश्मी बर्वे या अध्यक्ष होत्या. नवा अध्यक्ष ठरवताना केदार यांची भूमिका निर्णायक ठरली. पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद केदार गटाला देण्यात आल्याने उर्वरित काळासाठी ते इतरांना द्यावे, अशी काँग्रेसमधील केदार विरोधी गटाची मागणी होती. यातूनच पक्षातील नाना कंभालेंनी वेगळी चूल मांडली. त्यांच्याकडे तीन सदस्य असल्याचा दावा केला जात होता. मात्र त्यातील दोन सदस्य सोमवारीच तंबुत परतल्याने कंभाले एकाकी पडले. काँग्रेसकडे असलेले 33 सदस्यांचे संख्याबळ लक्षात घेता नाराज सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली तरी याचा काँग्रेसच्या विजयावर परिणामाची शक्यता नव्हती.

दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसच्या 32 सदस्यांची व्यवस्था कळमेश्वरमधील एका फार्महाऊसवर करण्यात आली होती. त्यांच्यासोबत शेकापचा एक व राष्ट्रवादीचे दोन सदस्यही होते. सोमवारी निवडणुकीसाठी या सदस्यांना तेथून थेट जिल्हा परिषदेत आणण्यात आले. भाजपकडे संख्याबळ नसतानाही अध्यक्षपदासाठी नीता वलके तर उपाध्यक्षपदासाठी कैलास बरबटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर भाजपाने दोघांची उमेदवारी मागे घेतली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अमित शाह ने ग्वालियर लोकसभा चुनाव प्रबंधन समिति की बैठक ली

अमित शाह ने ग्वालियर लोकसभा चुनाव प्रबंधन समिति की बैठक ली टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

कई बड़े नेताओं के लिए भी सीट नहीं ले पाई कांग्रेस?दबाव बनाने में सफल रहे अखिलेश

कई बड़े नेताओं के लिए भी सीट नहीं ले पाई कांग्रेस? दबाव बनाने में सफल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *