Breaking News

’27 इंच’ उंचीच्या अजीमचे ठरले लग्न

Advertisements

लग्न करून सुखी संसार असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते. तरीही, काही ना काही कारणास्तव अनेकांना लग्नासाठी योग्य जोडीदार न मिळण्याची उदाहरणं कित्येक आहेत.उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील अजीम मंसूरी यांनाही उंचीमुळे लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. अजीमची उंची फक्त 27 इंच म्हणजे 2.3 फूट इतकी आहे. त्याने आपल्या लग्नासाठी राजकीय नेत्यांचीही भेट घेतली होती. अखेर अजीमला मुलगी मिळाली असून नोव्हेंबरमध्ये त्यांचे लग्न आहे.

Advertisements

अजीम मन्सूरी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःसाठी मुलगी शोधत होते. उंचीमुळे त्यांना मुलगी भेटत नव्हती. त्यांनी लग्नासाठी वेगवेगळ्या राजकीय व्यक्ति आणि सरकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. अजीम साठी नवरी शोधणे खूप कठीण होते.
अजीम हा फक्त 5 वी शिकलेला आहे. शाळेत असताना कमी उंचीमुळे त्याला अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागला त्यामुळे त्याने शिक्षण सोडून दिले होते.

Advertisements

बातम्यानुसार, अजीम एक कॉस्मेटिक स्टोर चालवतात आणि त्यांचे उत्पन्न चांगले आहे. शाळा सोडल्यानंतर त्यांनी आपल्या भावांना कॉस्टेमटिक स्टोरमध्ये मदद करायला सुरुवात केली.

अजीम मंसूरीचा बायकोसाठीचा शोध मार्च 2021 मध्ये संपला. हापूडची राहणारी 3 फूट लांब बुशरा सोबत एप्रिल 2021 ला अजीम मंसूरी सोबत साखरपूडा झाला. मात्र, बुशराचे पदवीचे शिक्षण पूर्ण होत होते त्यामुळे अजीम आणि बुशाराचा विवाह 7 नोव्हेंबरला बुशाराचे शिक्षण पूर्ण झाल्यावर होणार आहे. अजीम यांनी आपल्या लग्नासाठी खास शेरवानी आणि थ्री-पीस सूट तयार करून घेतला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नशापान से भटक रहे युवाओंको अध्यात्म की जरुरत : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नई दिल्ली। युवा पीढ़ी को नशा पथ भ्रष्ट कर रही है। पहले मनुष्य नशा खाते …

भ्रष्टाचारीओ पर कडी कारवाई की जरुरत : CBI की जिम्मेदारी बढी : PM मोदी बोले,’किसी को नहीं बख्शना…’

नई दिल्ली । प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी ने सीबीआई के हीरक जयंती समारोह में कहा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *