Breaking News

पालघरमध्ये पहाटे चार वाजता भूकंपाचे धक्के

Advertisements

पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज २३ नोव्हेंबरला पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला.

Advertisements

या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. पहाटे-पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही.

Advertisements

सन २०१८ साला पासून या भागामध्ये भूकंपाचे मध्यम व सौम्य धक्के बसण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा अधिक असणाऱ्या धक्क्यांची संख्या मोजकी आहे. गेल्या वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आज पहाटे बसलेल्या या मध्यम स्वरुपाच्या धक्क्यामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील नागरिक खडबडून जागे झाले.

पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांच्या अनुषंगाने राज्य शासनाने अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता व वारंवारता कमी झाल्याने तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘पीडब्लूडी’चे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना वैयक्तिक पुरस्कार घोषित

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला.याच …

मराठा आरक्षण : तेली समाज उतरणार रस्त्यावर

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात तेली समाज आक्रमक झाला आहे. चंद्रपुरात निघणाऱ्या महामोर्चात तेली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *