Breaking News

औरंगाबाद : १२८ लाचखोर ताब्यात ; महसूल विभाग आघाडीवर

Advertisements

यंदा लाचलुचपत विभागाने लावलेल्या १०५ सापळ्यांत ११ महिन्यांत १४० लाचखोर अधिकारी- कर्मचारी तसेच खासगी व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक सापळे पुणे विभागाने यशस्वी केले असून १४३ प्रकरणात २०२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर नाशिक विभागाने ११५ प्रकरणांमध्ये तब्बल १७२ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.

Advertisements

लाचखोरांविरोधात यशस्वी सापळे रचून आरोपी ताब्यात घेण्याच्या कारवाईत विभागाचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो.राज्यात १ जानेवारी २०२२ ते २४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान लाचखोरांना पकडण्यासाठी एकूण ६७० सापळे लावण्यात आले. यात ९३९ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राज्यभरात केलेल्या कारवाईत सर्वाधिक लाचेची मागणी करणाऱ्यांमध्ये महसूलशी संबंधित विभागाचा समावेश आहे. वर्षभरात १५६ प्रकरणे दाखल करण्यात आली. यात २१२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महसुल, भूमीअभिलेख व नोंदणी विभागाचा समावेश आहे.

Advertisements

✳️महसूल विभागाशी संबंधित सापळ्यांमध्ये एकूण ३६ लाख ७५ हजार २५० रुपयांची लाच मागण्यात आली होती. मात्र पोलिस विभागात एकूण १४४ सापळे रचण्यात आले. त्यात २०१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात वर्ग एकचे सहा अधिकारी आहेत. वर्ग २ चे २२, वर्ग तीन १३८ तर, वर्ग चारचे १२ तसेच इतर ४३ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी १४४ प्रकरणांमध्ये ३८ लाख ६८ हजार रुपयांची लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे.

✳️सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण १२ सापळे लावण्यात आले. यात १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. या १२ सापळ्यांमध्ये बांधकाम विभागाच्या वर्ग एकचे ४, वर्ग दोनचे दोन आणि वर्ग तीनच्या सात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १२ सापळ्यांमध्ये संबंधितांची ३३ लाख ४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

✳️महावितरणामध्ये चाळीस प्रकरणात ५२ जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणांमध्ये संबंधितांची एकूण ६ लाख ८९ हजार ३०० रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

✳️जलसंपदा विभागात वर्षभरात पाच सापळे रचण्यात आले. यात आठ जणांना यात आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ५२ लाख रूपयांची लाच मागितली होती.

✳️राज्यात अपसंपदा प्रकरणात एकूण दहा प्रकरणे नोंदविण्यात आलेली आहे. अपसंपदा प्रकरणात पोलिस विभाग आघाडीवर आले. पोलिस विभागाच्या एका अपसंपदा प्रकरणात १२ कोटी ६५ लाख ६३ हजार ९६६ मालमत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या ३ प्रकरणांमध्ये ४१ लाख ८२ हजार ९९८ रुपयांची नोंद करण्यात आली आहे.

✳️महापालिकेच्या पाच प्रकरणांमध्ये १० कोटी ९८ लाख ७४ हजार २२१ रूपयांची नोंद करण्यात आली आहे. अपसंपदा प्रकरणात विभागातही एका प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

गले में तख्ती टांग जान की भीख मांगते हैं उत्तरप्रदेश के अपराध-माफिया दबंग लोग

लखनऊ । उत्तरप्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कहा कि छह साल पहले प्रदेश में …

सांसद बृजभूषण शरण सिंह को कौन बचा रहा है? कानून या राजनीति : मामला बडा ही पेचीदा है

नई दिल्ली । सांसद और कुश्ती महासंघ के अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह के खिलाफ दिल्ली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *