Breaking News

वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला ट्रकसोबत फरफटत नेले

Advertisements

वाळूची अवैध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे यांना वाळू तस्कराने ट्रकसोबत फरफटत घेऊन जात जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Advertisements

ही घटना अर्जुननगर ते पीडीएमसी दरम्यानच्या मार्गावर बुधवारी सकाळी ७.३५ वाजेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी एपीआय योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून शोएब अहमद एजाज (रा. आझादनगर), रेहान शेख गुलाब शेख (रा. सबा नगर) व अहफाज अहमद (रा. आझादनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलिसांनी शोएब अहमद व ट्रकचालक रेहान शेख यांना अटक केली आहे. एपीआय योगेश विनायकराव इंगळे हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांनी ट्रकला अर्जुननगरजवळ थांबण्याचा इशारा दिला. परंतू चालकाने ट्रक इंगळे यांना ट्रकसोबत फरफटत नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

गाणं गात असताना प्रसिद्ध गायिकेवर गोळीबार…नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. निशा लाइव्ह इव्हेंटचे सादरीकरण करीत …

लाखों की सागौन लकड़ी के साथ पांच लकडी तस्कर और 3 वाहन गिरफ्तार

विलासपुर। छत्तीसगढ़ के गौरेला-पेंड्रा-मरवाही (GPM) जिले में वन विभाग की टीम ने तीन अलग-अलग कार्रवाई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *