Breaking News

थंडीने होणार नववर्षाचे स्वागत : गारठा वाढेल

राज्यात कोकण वगळता इतरत्र गारठा वाढलाय. डिसेंबरअखेरीस असणारी थंडी यंदा मात्र जाणवत नसल्याचे दिसत आहे. सरासरीपेक्षा किमान तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे. मात्र जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडी वाढू शकते,असे अनुमान आहे. या काळात खूप तीव्र थंडी नसेल. सध्याच्या तुलनेत तापमानात घसरण होऊन थंडीची पुन्हा एकदा जाणीव होऊ शकेल.

उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे २३ ते २७ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काहीशी थंडी निर्माण झाली होती. सध्या तिथे दाट धुक्याची चादर असून याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. या वातावरणामुळे राज्यातील थंडी काहीशी कमी झाल्याचे हवामान विभागातील अधिकारी सांगतात.यानंतर पुन्हा पश्चिमी प्रकोपामुळे १ जानेवारी २०२३ पासून उत्तर भारतात हिमवर्षावाची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव थोडा वाढू शकेल.या काळात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही.

About विश्व भारत

Check Also

PWD, नागपुरातील दुय्यम निबंधकाकडून राष्ट्रध्वज फडकविताना नियमभंग

स्वातंत्र्य दिनाच्या वेळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील भगतसिंग चौक येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या …

आज पावसाचा अंदाज कुठे?

आज पावसाचा अंदाज कुठे? अतिमुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट) मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग पुणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *