Breaking News

आमदार बच्चू कडू यांचा भीषण अपघात, डोक्याला मार

माजी राज्यमंत्री आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. आज अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहा च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू रोडच्या दुभाजकावर जोरदार आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याचे समजते.

About विश्व भारत

Check Also

मुंबई को अलग रखने के तर्कों का बाबासाहब ने किया था विरोध

मुंबई को अलग रखने के तर्कों का बाबासाहब ने किया था विरोध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

एकनाथ शिंदेनी फडणवीसांना डावलून अमित शहाची घेतली भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *