Breaking News

नागपुरला येत असताना काँग्रेसच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. ते नागपूर येथील बैठकीला जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान काल त्यांना हदय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे घराणे होते. युवक काँग्रेस पासून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली. तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी नाशिकच्या माजी उपमहापौर आहेत.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भांडेवाडीत भीषण आग : विझवताना अग्निशमन वाहन जळाले

नागपूरमधील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली. सर्व शहरातला कचरा याठिकाणी जमा केला …

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *