नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद होणे नवीन नाही. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यात पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांची मोठी गर्दी असते. पाेलीस अधिकारी आणि वकिलामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली.
संबंधित वकिल न्यायालयामध्ये प्रवेश करताना चुकीच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. यावरून दोषांमध्ये सुरुवातीला शाब्दीक वाद झाला. त्यानंतर वाद वाढत गेला व पोलिसांनी संबंधित वकिलाचे तोंड फोडल्याची माहिती आहे. या घटनेचा वकील संघटनांकडून निषेध केला जात आहे. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही वकिलांकडून केली जात असल्याची माहिती आहे.