Breaking News

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू

Advertisements

चंद्रपूरातील भद्रावती तालुक्यातील माजरी येथे जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन वाघिणीचा रविवारी मृत्यू झालाय. रविवार, १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या मुख्य लाईनजवळील सी केबिनच्या मागील भागात वाघिणीचा मृतदेह आढळला. वाघीण मृतावस्थेत दिसताच याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली.

Advertisements

माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे,यासाठी जिवंत विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली आहे. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या ताराला गुंडाळला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी पुढे पाठविला असून अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

अंधाधुंद तरीके से झाड काटे जाने से जंगली जानवरों का ग्रामीणों मे आक्रमण 

अंधाधुंद तरीके से झाड काटे जाने से जंगली जानवरों का ग्रामीणों मे आक्रमण टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *