Breaking News

चंद्रपुरात भूकंप : नागरिकांमध्ये भीती

Advertisements

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ व लालपेठ परिसरात रविवारी रात्री 9 वाजून 31 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

Advertisements

तर, ‘वोल्कॅनो डिस्कवरी डॉट कॉम’ या संस्थेच्या संकेतस्थळावर भूकंपाची तिव्रता एक मॅग्नेट्यूडपेक्षा अधिक दर्शवण्यात आली. भूपृष्ठापासून दहा किलोमीटरच्या खोलीत भूकंप घडून आल्याची नोंद आहे. परंतु, ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी’ या भारतातील अधिकृत संकेतस्थळावर याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नव्हती.

Advertisements

भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंप : पण, प्रशासन म्हणते…!

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर …

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *