Breaking News

पार्किंगच्या वादात नागपुरात तरुणाचा खून

Advertisements

घरासमोर वाहन पार्क केल्याने दोन गटात वाद विकोपाला गेला. यात झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला. ही घटना नागपुरातील यशोधरानगर परिसरात घडली. घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश धामने (वय 19) असे आहे.तो इंदिरा गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेत रामभाऊ शाहू व मोनू असे दोघे जण गंभीर जखमी आहेत.

Advertisements

प्रकरण काय?

Advertisements

दोन दिवसांपूर्वी रामभाऊ शाहू आणि योगेश धामने यांचा मोनू रायतदार, सुदामा आणि त्यांचा काका नंदनलाल रायतदार यांच्यात वाहन पार्क करण्यावरून वाद झाला होता. वादात एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर योगेश हा रामभाऊ शाहू यांच्या घरी आला. ते दोघेही बाहेर उभे असताना, मोनू आणि योगेशमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून रामभाऊ यांनी मोनूला मारहाण सुरु केली. आवाज ऐकून नंदलाल आणि सुदामा आले व त्यांनी चाकू, दंडा आणि लोखंडी रॉडने योगेशला मागण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत योगेशचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत रामभाऊ शाहू आणि मोनू गंभीर जखमी झाल्याने त्यांना मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोनू बन्सीलाल रायतदार सुदामा बन्सीलाल रायतदार आणि नंदलाल रायतदार या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *