Breaking News

सुनील केदारांची भाजपवर जुन्या पेन्शनवरून जोरदार टीका

Advertisements

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा जुनी पेन्शन योजना आहे. प्रत्येक उमेदवार हाच मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करीत आहे. हाच धागा पकडून माजी क्रीडा मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांनी पेन्शन योजनेबाबत भाजप दुटप्पी धोरणावर टीका केली आहे.

Advertisements

नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांची प्रचारसभा रविवारी नागपुरात झाली. यावेळी केदार यांनी भाजपला पेन्शनच्या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Advertisements

काय म्हणाले केदार?

आणीबाणीच्या काळात मिसाबंदी कायद्याखाली अटक झालेल्या बहुतांश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पेन्शन लागू करण्यात आली आहे. त्यावरून माजी मंत्री सुनील केदार यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिक्षकांना जुनी पेन्शन दिल्यास आर्थिक गणित बिघडते, पण कायद्यात नसतानाही तुमच्या लोकांना पेन्शन देता, तेव्हा आर्थिक बिघडत नाही काय, असे सत्तेत बसलेल्यांना विचारले पाहिजे, असे केदार म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात विमानातील १६९ प्रवासी…!मोठी घटना

आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे आपत्कालीन वळविणे आणि झारखंडमधील एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात अशा दोन वेगवेगळ्या घटनांनी मंगळवारी …

सांसद साहू ने फोरलेन निर्माण हेतु केन्द्रीय मंत्री गडकरी को सौंपा ज्ञापन

सांसद साहू ने फोरलेन निर्माण हेतु केन्द्रीय मंत्री गडकरी को सौंपा ज्ञापन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *