Breaking News

हनुमानाच्या आदेशाने करतोय समस्या निराकरण : बागेश्वर सरकार

Advertisements

एका वृत्‍त वाहिनीला माहिती देताना बागेश्वर महाराजांनी म्‍हटलं आहे की, “मी कोणी तपस्‍वी किंवा माइंड रिडर नाही. मात्र, मी ज्‍यावेळी गादीवर बसलेला नसतो, त्‍यावेळी मी एक साधारण मनुष्‍य असतो. तर गादीवर बसताच हनुमान यांचे ध्यान केल्‍यावर जो आदेश मिळतो, तो मी कागदावर लिहितो. जेंव्हा लोक माझ्याकडे एखादी समस्‍या घेवून येतात तेव्हा मी आमच्या गुरूंकडून प्रेरणा घेतो आणि त्या समस्‍येविषयी कागदावर लिहून निराकरण करतोय ,” असे बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर सरकार म्‍हणाले.

Advertisements

अंनिसचे पंडित धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्रींना आव्‍हान
बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेशवर सरकार यांनी नागपुरात येऊन भक्तांसमोर नव्हे तर पत्रकार भवनात आपले दावे पूर्ण करावेत, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिले होते. यानंतर बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटना नागपुरात शुक्रवारी रस्त्यावर उतरल्या. संविधान चौक येथे झालेल्या आंदोलनात अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

Advertisements

बागेश्वर बाबांना आपल्‍या भक्‍तांच्या समस्‍या ऐकून त्‍या सोडवण्यासाठी दिव्य दरबार भरवतात. मात्र लोकांच्या मनातील गोष्‍ट त्‍यांनी सांगण्याआधीच बाबा मनातल्‍या मनात वाचून ते एका कागदावर लिहितात. यानंतर बाबा त्‍या अडचणीवर लोकांना उपायही सांगतात. बाबांच्या दिव्य दरबारात येणाऱ्या लोकांचे म्‍हणणे आहे की, बाबा हे सिद्ध पुरूष आहेत. बागेश्वर धाम सरकारची कथा सध्या छत्‍तीसगढच्या रायपूर मध्ये सुरू आहे. या ठिकाणीही त्‍यांनी दिव्य दरबार लावलेला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *