राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा स्वीकारला आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली, अशी घोषणा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडून करण्यात आली आहे. कोश्यारी राजकारणात लवकरच सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांचही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रपती मुर्मू यांनी राधा कृष्णन माथूर यांचा लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर म्हणून राजीनामा स्वीकारला. तर डॉ. बीडी मिश्रा यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन, आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.