Breaking News

वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिला वनरक्षकाचा बळी : अवैध वृक्षतोड प्रकरण

Advertisements

वन विकास महामंडळाच्या भिसी उपक्षेत्रातील जंगलात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी वनरक्षक अमोल झलके यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनानंतर त्यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी मोकाट असून कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याने संशय वाढला आहे.या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

चिमुर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रातील नाला खोलीकरणाच्या नावाखाली वनरक्षक अमोल झलके यांनी महालगाव काळू वनविकास महामंडळातील जंगलात झाडाची कत्तल केली. हिरव्यागार जंगलाला भकास केले. वन संवर्धनाचा वसा घेतलेल्या वनविभागाकडून हे कृत्य झाल्याने पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी आक्षेप घेतला होता.

Advertisements

त्यानंतर वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. वनरक्षकाला वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झाला. मात्र माध्यमांनी हे प्रकरण लाऊन धरल्यानंतर वनविभागाला उशिरा का होईना, कारवाई करावी लागली आहे. अखेर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनरक्षकाला दोषी धरुन चौकशी अंती निलंबित केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *