Breaking News

आईने दिली किडनी,मुलाला मिळाले जीवनदान : वर्धा जिल्ह्यातील घटना‎

Advertisements

आई-वडील अर्थात जमिनीवरील परमेश्वरच. आपल्या लाडक्या मुलांसाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात.मुलाच्या गंभीर रोगावर फुंकर मारण्यासाठी आई धावून आली. आईने मुलाला किडनी देऊन जीवदान दिले.

Advertisements

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर‎ स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे १९वी‎ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया‎ यशस्वी झाली. ६३ वर्षीय आईने ३७‎ वर्षीय मुलाला आपली किडनी देऊन‎ त्याला एकप्रकारे पुनर्जन्मच दिला‎ आहे. राज्य शासनाच्या महात्मा‎ जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत‎ ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात‎ आल्याची माहिती सुपर स्पेशालिटी‎ रुग्णालय प्रशासनाने दिली.‎ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील‎ गांधी चौक रहिवासी इरफान गुलाम‎ मुस्तफा खान (३७) हा गेल्या चार ते‎ पाच वर्षांपासून किडनीच्या विकाराने‎‎‎‎‎‎ त्रस्त होता. त्याच्यावर खासगी‎ रुग्णालयामध्ये डायलिसिस सुरू‎ होते. परिस्थिती हलाखीची असल्याने‎ जवळचे नातेवाइक तसेच‎ मित्रपरिवार, काही सामाजिक‎ संस्थांकडून त्याला उपचारासाठी‎ मदत होती.

Advertisements

तर इरफानचे वडील‎ मुस्तफा खान मिल कामगार म्हणून‎ सेवानिवृत्त झाले आहेत. अखेर सुपर‎ मध्ये या युवकाला उपचारासाठी‎ दाखल केल्यानंतर तज्ज्ञांनी त्याची‎ आई हसीना बेगम गुलाम मुस्तफा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खान (वय ६३) यांचे समुपदेशन‎ करून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया‎ करण्याचा निर्णय घेतला. आई हसीना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खान यांनीही आपल्या पोटच्या‎ गोळ्यासाठी किडनी देण्याचा निर्णय‎ घेतला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय!

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

‘हार्ट अटॅक’ येण्यापूर्वीची लक्षणे कोणती?

महिन्याभरापूर्वी समजतात लक्षणे एक महिना आधी हार्ट अटॅक येणारपूर्वी थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *