Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई : मतदानावेळी ‘ईव्हीएम’सोबत फोटो!

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एक वाद ओढवून घेतला.कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रविवारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

Advertisements

कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मतदान होत आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर, हेमंत रासने आणि आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. पण, याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे.

Advertisements

रुपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला, पण मतदान करताना त्यांनी चक्क ईव्हीएम मशीनसोबतचं फोटो काढला. ईव्हीएमवरील कोणतं बटन दाबलं, हे त्यांच्या फोटोत स्पष्ट दिसत आहे. त्या इतक्यावरच थांबल्या नाही, तर त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

मतदान हे गोपनीय असतं आणि आचारसंहिताही लागू आहे, पण रुपाली ठोंबरेंनी कुणाला मतदान केलं, याचा थेट फोटोच शेअर केलाय. असं करून त्यांनी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हे महत्त्वाचं.

कायदा काय म्हणतो?

लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 128 अन्वये मतदान हे गोपनीय असते.मतदाराला त्याने कुणाला मतदान केलं, याबद्दल गुप्तता बाळगावी लागते. जर मतदाराकडून गोपनीयतेचा भंग झाल्यास त्याच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 128 नुसार कारवाई होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

रामटेकमध्ये सेनेचा पराभव होण्याची भीती? भाजपचा ‘प्लॅन’ काय आहे?

रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली आहे. पक्षाचा पराभव …

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र फडणवीस का बड़ा हमला

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *