Breaking News

नागपूरमध्ये अत्याचार : प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या

Advertisements

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. दीपक इंगळे असं या प्रियकराचं नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार समोर आली होती. त्याचा तपास करताना ही माहिती समोर आली. दीपक इंगळेची कसून चौकशी केली असताना त्याने हत्येची कबुली दिली. सुषमा काळवंडे असं मृत महिलेचं नाव आहे.

Advertisements

काय आहे प्रकरण?

Advertisements

दीपक इंगळेचे मृत महिलेसोबत प्रेमसंबंध होते. २३ तारखेला दीपक या महिलेला घेऊन हिंगणा भागातील रुई शिवारात गेला होता. तिथे त्याने या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या केली.हत्या केल्यावर दीपक तिथून पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

२३ मार्चला सुषमा काळवंडे ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दीपक इंगळे आणि सुषमा यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे दीपकला आम्ही पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. चौकशी करत असताना त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा दीपकने गुन्हा कबूल केला. २३ तारखेला रुई येथील शिवारात दीपकने तिला आणलं होतं. त्याने तिथे तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तिला संपवलं. तो तिथून पळून घरी गेला होता. त्यानंतर चौकशीकरीता आल्यावर जेव्हा दीपकने गुन्हा कबूल केला तेव्हा त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *