रामटेक विधानसभा क्षेत्रातील मनसर व पारशिवनी भागातील हजारो तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रखर हिंदूत्व विचाराने प्रेरित होवून आणि रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या नेतृत्वाखाली तथा पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या प्रयत्नाने मनसर तसेच पारशिवनी येथील असंख्य तरूणांनी मनसेत प्रवेश केला.
उपस्थित मान्यवर…
सदर कार्यक्रमाचे आयोजन डॕनी (सनी) दिलीप धानोरे यांनी केले. यावेळी पक्षाचे अंबाझरी पथई ग्रा. पं. सरपंच संदिप वासनिक व सदस्य कुंदन राऊत, मनोज पालिवार, बजरंग काटोले, विनायक महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.
यांनी केला प्रवेश…
या वेळी रोहित धानोरे, आदर्श वाढीवे, संजय टेकाम, आकाश वरखडे, ज्ञानेश्वर परतेती, अनुराग गौर, तरूण कश्यप, कमल मडावी, अरपीत निमगडे, प्रज्वल टेमरे, संतोष बरडे, धर्मेंद्र पाल, कुंदन बोरकर, शुभम महाकाळकर, चेतन जामखुरे, पवन भोयर आदी तरूणांनी प्रवेश केला.