Breaking News

भाजपच्या बढ्या नेत्याला लागला नगरसेविकेचा धक्का आणि काय झाले तर वाचा…!

Advertisements

पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींतर्फे काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेत एक विचित्र घटना घडली. यात्रेत गर्दीत चालत असताना भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांना धक्का लागला. संतापलेल्या तावडे यांनी स्थानिक माजी नगरसेविकेला सर्वांसमक्ष झापल्याचा प्रकार समोर आला.कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह या मार्गावर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.

Advertisements

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे सहभागी झाले होते. या यात्रेत सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही यात्रा चालत गरवारे पुलाजवळ आली असताना गर्दीत तावडे यांना धक्का लागला. तावडे यांच्या बाजूने भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका चालत होत्या. मात्र गर्दीत धक्का लागल्याने संतापलेल्या तावडे यांनी मुलाहिजा न बाळगता सर्वांसमक्ष त्या नगरसेविकेला झापले. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा या यात्रेत जाहीर अपमान झाला. तावडे यांचा आवेश पाहून या यात्रेतील सहभागी अक्षरशः अवाक् झाले.या घटनेचे पडसाद लगेच उमटले. आणि काही काळ का होईना संताप व्यक्त करण्यात आला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *