Breaking News

अजित पवार जाणार भाजपमध्ये!उद्धव ठाकरे काँग्रेससोबत!

राज्यात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. या चर्चेमुळे चर्चेत आले आहेत ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे अजित पवारही बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेला उधणा आले आहे. अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्रीवर काँग्रेसचे मोठे नेते पोहचले आहेत.

राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईकडे निघाले आहेत.यात अजित पवार समर्थक आमदारांचा समावेश आहे. अजित पवारांशी मुंबईत चर्चा करून ठरवणार असल्यानं मुंबईला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी दिली. तर, दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडेही मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद असल्यानं चर्चांना उधाण आले आहे. तर, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत असतील आणि अजित पवार भाजपसोबत जाणार, अशी चर्चा आहे.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ: PM मोदी का कथन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ:PM मोदी का कथन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *