Breaking News

मंत्री संजय राठोडांच्या स्वीय सहायकाकडून पैशाची मागणी : खळबळ

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात काय सुरु आहे? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.शिंदे गटातील शिवसेनेचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे PS, OSD औषध विक्रेत्यांना प्रचंड पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेने केला आहे. यापूर्वी वन मंत्री आणि महसूल राज्यमंत्री असतानाही संजय राठोड गोत्यात आले होते.

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे पीए आणि ओएसडी औषध विक्रेत्यांकडे प्रचंड प्रमाणात पैसे मागत असल्याचा धक्कादायक आरोप महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेकडून करण्यात आला आहे. तशा आरोपांचे पत्र या संघटनेच्या राज्यसचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.कारणाने औषध विक्रेत्यांवर झालेल्या कारवाई संदर्भात निकाल देण्यासाठी बराच उशीर अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाकडून होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईवर निकाल देण्यासाठी आणि छोट्या छोट्या त्रुट्यासाठी औषध विक्रेत्यांकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे पी एस. डॉ. विशाल राठोड त्याचबरोबर OSD संपत डावखर आणि चेतन करोडीदेव मोठ्या प्रमाणात औषध विक्रेत्यांकडे पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्रालयीन कार्यालय हे भ्रष्टालय झाल्याचा आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

About विश्व भारत

Check Also

उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ के खिलाफ अविश्वास प्रस्ताव से विपक्ष के छूटे पसीने

उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ के खिलाफ अविश्वास प्रस्ताव से विपक्ष के छूटे पसीने! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मैं टाइम पर आया?आप लेट आए हैं?राहुल गांधी

‘मैं टाइम पर आया?आप लेट आए हैं?राहुल गांधी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *