Breaking News

काँग्रेसला वाटतंय, कर्नाटक जिंकल्याने देशावर कब्जा! : भाजपने उत्तर प्रदेशात मारली बाजी

Advertisements

✍️मोहन कारेमोरे

Advertisements

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. २०१८ च्या तुलनेत काँग्रेसला ५० जागा जास्त मिळाल्या तर भाजपला ४० हून अधिक जागा कमी मिळाल्या. भाजपला जबरदस्त फटका बसल्याचं चित्र आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, असं काही नेते म्हणतात, हे खरे आहे.

Advertisements

भाजप येथे विजयी

मात्र, दुसरीकडे उत्तर प्रदेशातील लोकल बोर्डाच्या निवडणुकीत भाजपला एकतर्फी विजय मिळालेला आहे.

कर्नाटकचा निवडणूक इतिहास

कर्नाटकचा इतिहास पाहिला तर तिथे सरकार रिपीट होत नाही. 2018 मध्ये भाजपला जितकी मत मिळाले त्याच पॉइंटमध्ये मते कमी झाली, पण जागा जास्त कमी झाल्या. जेडीएसची पाच टक्के मत कमी होऊन ती काँग्रेसला गेली त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्याचे दिसते.

काँग्रेस हवेत?

कर्नाटक निवडणूक जिंकल्यानंतर काही लोकांना देश जिंकले अस वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. आज उत्तर प्रदेश मधल्या लोकल बोर्डाचा निकाल लागला. यामध्ये भाजपचा एकतर्फी विजय झालाय. जो उत्तर प्रदेश जिंकतो, तो देश जिंकतो असं म्हणतात.

कर्नाटकात काँग्रेस विजयी झाल्यानं आणि भाजपच्या पराभवामुळे विरोधकांनी जल्लोष केला. ‘बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना’अशी काही लोकांची स्थिती आहे. या लोकांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरी मुल झाले तर आनंद साजरा केला, असे भाजप नेते काँग्रेसवर आरोप करताना म्हणतात.

शरद पवार?

महाराष्ट्रावर किंवा देशाच्या निकालावर कर्नाटक निकालाचा काही परिणाम होणार नाही. शरद पवारांना कर्नाटकमध्ये शून्य टक्केही जागा नाही, माझं मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले. वार्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो तरी त्यांना शहा मोदींचा पराभव दिसतो. मुंगेरी लाल के हसीन सपने कधी पूर्ण होणार नाहीत, असे सध्यातरी दिसते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *