Breaking News

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ठरविणार कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री

Advertisements

काँग्रेसने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत १३६ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता वाढली असताना हा तिढा सोडविण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

Advertisements

त्यानुसार रविवारी एका विशेष विमानाने शिंदे बंगळुरूला रवाना झाले. कर्नाटकात काँग्रेसने धवल यश मिळविल्यानंतर तेथे सत्तास्थापनेला वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोघे नेते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटकासाठी पक्षनिरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जबाबदारीसंदर्भात शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

Advertisements

नवी दिल्लीहून पक्षश्रेष्ठींचा सुशीलकुमार शिंदे यांना पक्ष निरीक्षक म्हणून तात्काळ रवाना होण्यासाठी आदेश प्राप्त झाला. त्यानंतर लगेचच त्यांना बंगळुरूला नेण्यासाठी विशेष विमानही सोलापुरात आले. शिंदे हे या विशेष विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले. मुख्यमंत्रिपदाची निवड प्रक्रिया होईपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. पक्ष निरीक्षकपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजताच सात रस्त्यावरील जनवात्सल्य निवासस्थानी स्थानिक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *