Breaking News

भाजपचे काही आमदार, खासदार जखमी : मंडप कोसळला

Advertisements

अमरावतीमध्ये भाजपच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला.मंडप कोसळल्यानंतर भाजपचे अनेक नेते त्याखाली अडकले होते. भाजपचे खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रविण पोटे हे मंडपाखाली अडकले होते. यानंतर सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर नितेश राणे थोडक्यात बचावले आहेत. या दुर्घटनेनंतर कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली होती.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी येथे भाजपच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांच्या कार्यक्रमाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे उडून गेला आहे. या कार्यक्रमाला भाजपा खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटे सह भाजप नेते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यानच मंडप कोसळ्याने सर्वच नेते मंडपाखाली अडकले होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *