बंडात साथ देणाऱ्या शिंदे गटातील मंत्र्यांना काढावे कसे, अशा धर्मसंकटात मुख्यमंत्री आहेत. यात कोणते मंत्री आहेत, ते जाणून घेऊया…
गुलाबराव पाटील(पाणी पुरवठा मंत्री): अपेक्षित कामे नाहीत
ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण मतदारांत सरकारविषयी नाराजी.
शिंदेंना का हवे : उद्धवसेनेकडून होणाऱ्या हल्ल्यांना आक्रमक उत्तर देणारे. उत्तर महाराष्ट्रात ताकदवान.
तानाजी सावंत (आरोग्य मंत्री): प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ नेमले
सार्वजनिक आरोग्य सुधारणेत कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात व्यवहारासाठी स्वत:चे ‘खासगी सचिव’ही नेमले.
शिंदेंना का हवे : प. महाराष्ट्रात मोठे प्रस्थ, ठाकरेंना तीव्र विरोध
संजय राठोड(अन्न व औषध मंत्री): औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी
भाजप समर्थक असलेल्या औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी. एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने समाजात प्रतिमा मलिन.
शिंदेंना का हवे : विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाची मते मिळवण्यात उपयोगी ठरतील.
अब्दुल सत्तार(कृषी मंत्री): कृषी योजनांचा लाभ नाही
केंद्राच्या योजनांचा लाभ कृषिमंत्री सत्तार खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी नाराज आहेत.
शिंदेंना का हवे : एकमेव मुस्लिम मंत्री. वेळोवेळी अनेक ‘अर्था’ने मदत. स्वबळावर विजयाची क्षमता.
संदिपान भुमरे(फलोत्पादन मंत्री): बदल्यांमध्ये गुंतले
रोहयो, फलोत्पादन योजना प्रभावीपणे अमलात आणल्या नाहीत. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेपाचा आरोप.
शिंदेंना का हवे : बंडासाठी सर्वात अग्रेसर. बंडखोरांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका. मराठा चेहरा.
भाजपवर रुसलेले शिंदे मुंबईतच; पण तीन दिवस अज्ञातवासातच राहणार
लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार, अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपचा हस्तक्षेप, कल्याणमध्ये पुत्र श्रीकांत शिंदेंना भाजपमधून तीव्र विरोध या कारणांमुळे मुख्यमंत्री शिंदे भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून ते अज्ञातवासात गेले. ते परराज्यात गेल्याचे सांगितले जात असले तरी सूत्रांनुसार मुंबईतच आहेत. शनिवारपर्यंत ते कुणालाही भेटणार नाहीत. खासगी व धार्मिक कामात व्यग्र असल्याचे सांगितले जाते.
विश्वभारत News Website