Breaking News

कर्मचाऱ्यांवर अन्याय : बदल्या रोखल्या : अपवादात्मक परिस्थितीतच बदल्या करा : अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा होतात?

राज्यातील विविध विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आणि येत्या काळात पुन्हा बदल्या होतील. मात्र, कर्मचारी (वर्ग-3 आणि वर्ग-4) मंडळीच्या बदल्या पुन्हा रखडू शकतात. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 2024 लोकसभा निवडणूकीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बदल्या कराव्या, असेही आयोगाने म्हटले आहे.

बदल्यांमध्ये घोळ!

सरकारी बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. जो अधिकारी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देईल, गैरव्यवहार करेल त्याला हवे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळते व जे मंत्र्यांच्या मनाविरुद्ध काम करेल त्यांना पद्धतशीरपणे बाजूला केले जात असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

बदल्यांच्या फाईल शिल्लक

दरवर्षी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याच्या बदल्या एप्रिल- मे महिन्यापर्यंतच केल्या जातात. पण या वर्षी बदल्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच निवासी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी अशा पदांच्या बदल्यांचे आदेश महसूल विभागाने जारी केले. जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात आखणीन मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची शक्यता आहे. तर, कर्मचारी मात्र आयोगाच्या निर्णयाने दुखावले आहेत.

About विश्व भारत

Check Also

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *