Breaking News

अजितदादा यांनी मंजूर केलेल्या फायली देवेंद्र फडणवीस तपासणार?मंत्र्याचा दावा

Advertisements

शिंदे गटाच्या प्रचंड विरोधानंतरही अखेर राज्याचे अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडेच गेले आहे. अजितदादांकडे अर्थमंत्रीपद गेल्याने शिंदे गटात अजूनही अस्वस्थता आहे.

Advertisements

महाविकास आघाडीत अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं. त्यावेळी अजितदादांनी शिवसेनेच्या आमदारांना अत्यंत कमी निधी दिला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांना भरमसाठ निधी दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती या सरकारमध्ये होऊ शकते, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे. त्यामुळेच ही अवस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे अजित पवार खरोखरच शिंदे गटाला निधी देताना हात आखडता घेणार की सढळ हस्ते निधी देणार याची जोरदार चर्चा रंगलेली आहे.

Advertisements

अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं तरी आता मागच्या काळासारखं होणार नाही. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळे मागच्या काळात जे असंतुलित काम झालं होतं, ते या काळात होणार नाही. त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते, ते कामाच्या रूपाने बाहेर येतील. हा निर्णय योग्य असल्याचं सांगत अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचं समर्थनही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *