Breaking News

आमदार अबू आझमीला देशातून लाथा मारून हाकला : मोहन कारेमोरे यांची मागणी

वंदे मातरम् जेव्हा सभागृहात लावले जाते, तेव्हा मी उभा राहतो. मी वंदे मातरमचा आदर करतो; पण मी ते बोलू शकत नाही. कारण, आम्ही फक्त अल्लाहला मानतो…’ समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या या वक्तव्याचे विधानसभेत संतप्त पडसाद उमटले. तर, अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी आझमीला लाथा मारून देशाबाहेर हाकला, अशी मागणी केली आहे. लवकरच आपण पंतप्रधान यांना याविषयावर पत्र लिहिणार असल्याचे कारेमोरे यांनी सांगितले.

सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी यावेळी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळात अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दरम्यान, वंदे मातरम् हे कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या संविधानानेच वंदे मातरम्ला राष्ट्रगानाचा दर्जा दिला आहे. जगातील कोणताच धर्म आपल्या मातेला प्रणाम करण्यापासून रोखत नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आझमी यांना सुनावले.

रामनवमीच्या दिवशी औरंगाबाद येथे रोशनगेट येथील राम मंदिरासमोर दोन धार्मिक समुदायांमध्ये वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता. त्यावेळी पोलिस गोळीबारात शेख नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी बोलताना आझमी म्हणाले, ज्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला, त्याचा या तणावाशी काहीच संबंध नव्हता. ती व्यक्ती आपल्या घरात होती. तसेच या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणात मोर्चे झाले. त्यात त्यांनी ‘इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा’, अशी घोषणा दिली. परंतु, ते आम्ही म्हणू शकत नाही. कारण, आम्ही फक्त अल्लाहला मानतो. आम्ही जगात कुणासमोरच मस्तक झुकवू शकत नाही. असे म्हणताच भाजपसह सत्ताधारी आमदार आक्रमक पवित्रा घेत वेलमध्ये आले आणि जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गदारोळामुळे कामकाज दहा मिनिटे तहकूब केले.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ: PM मोदी का कथन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ:PM मोदी का कथन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *