Breaking News

महिला पोलीस अधिकाऱ्याने काढली गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड

Advertisements

पोलिसांचं काम आव्हानात्मक असतं. कारण या जगामध्ये विकृत आणि राक्षसी प्रवृत्तींना ठेचण्याचे काम पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करतात. गुन्हेगार कितीही चपळ असला तरी त्याला शोधून काढण्यात आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळतंच. पोलिसांनी अशा शेकडो, हजारो गुन्हेगारांना पकडलं आहे. पण तरीही काही जण गुन्हेगारी सोडत नाहीत. याउलट ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचं हे दहशत माजवण फार काळ टिकत नाही. कारण पोलीस त्यांचा अतिशय योग्य पद्धतीने बंदोबस्त करतात. या गोष्टींचा प्रत्यय आज औरंगाबादमध्ये बघायला मिळाला आहे.

Advertisements

टोळीची परिसरात दहशत

Advertisements

पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड काढली. वर्चस्व वादातून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला होता. उज्जैन येथील दुर्लभ कश्यप या गुंडाला फॉलो करणारी ही टोळी आहे. गेल्यावर्षी त्यांनी एका चौकाला कश्यपचे नाव दिले होते. तेव्हापासून या टोळीची दहशत आहे.

पोलिसंनी नेमकी कशी अद्दल घडवली?

या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी कश्यप टोळीच्या पाच आणि विरोधी टोळीच्या एक अशा सहा जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना चांगलीच अद्दल घडवली आहे. ते ज्या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी करायचे त्याच भागात पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या आरोपींना असाप्रकारे फिरविल्याने पोलीस निरीक्षक राजश्री आडे आणि पुंडलिकनगर पोलिसांचे नागरिकांनी आभार मानले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

साली बनकर लडकी की ‘सेक्सी’करतूत!

सावधान: लडकी की करतूत’साली’ बनकर बात कर रहा था ठग!   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *