नागपूर जिल्ह्यात जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी आणि त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथ लांजेवार यांच्या शेतावर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः धानाच्या बांधीत उतरुन रोप लावणी केली. तसेच लांजेवार यांच्याकडील जतन करून ठेवलेले राळा, नाचणी, खपली गहू याबद्दल माहिती घेतली. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, फळबाग लागवडीची पाहणी केली.
तसेच ट्रॅक्टर चालवून चिखलणी केली.
भाताची रोवणी करण्यापूर्वी शेताची विशिष्ट पद्धतीने मशागत करणे आवश्यक असते. याला चिखलणी म्हणतात. पूर्वी बैलांच्या मदतीने हे चिखलणी करण्यात येत होती. आता ट्रॅक्टरच्या मदतीने चिखलणी करण्यात येते. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून चिखलणी करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. यामुळे शेतकरी आश्चर्यचकित झाले.
श्री पद्धतीचा अवलंब करावा
नागपूर जिल्ह्यामध्ये भाताची रोवणी करताना श्री पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः धानाच्या बांध्यामध्ये उतरून लागवड केली. तसेच ट्रॅक्टर चालवून चिखलणी केली. जिल्हाधिकारी स्वतः शेताच्या बांधावर उतरल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा आनंद झाला.
विश्वभारत News Website