Breaking News

पीडब्लूडी नागपुरात अजित पवारांना देणार पोलीस आयुक्ताचा बंगला

Advertisements

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागपुरातील मुक्काम अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानाशेजारी असेल. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून नागपुरातील सहपोलीस आयुक्तांचा बंगला अजित पवार यांना देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा एकमत झालंय. याबाबतचा प्रस्ताव पाठवल्याचा माहिती आहे. PWD चा ३१/१ हा बंगला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. पण उपराजधानीत उपमुख्यमंत्र्यासाठी देवगिरी हा एकच बंगला आहे. सध्या देवगिरी हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलाय. त्यामुळे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील सहपोलीस आयुक्तांचा बंगला देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकमत झालंय.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

२१ एप्रिलपासून शासकीय कर्मचारी संपावर!

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा …

३१ वर्षीय तहसीलदाराचा भीषण अपघातात मृत्यू : कारने चिरडले झाडाला

लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *