Breaking News

नागपूरमध्ये दगडी कोळसा काढण्यासाठी केला स्फोट : बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Advertisements

नागपूरमध्ये दगडी कोळसा काढण्यासाठी केलेल्या स्फोटामुळे बसलेल्या हादऱ्यात घर कोसळले. या दुर्घटनेमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील कांदरी-कन्हान येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी ब्लास्टिंग बंद करण्याची मागणी केली आहे.

Advertisements

जिल्ह्याच्या कांदरी-कन्हान येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे घर कोसळून याठिकाणी बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील जमिनीतील दगडी कोळसा काढण्यासाठी वेकोली या सरकारी कंपनीकडून नेहमी ब्लास्टिंग केले जाते. त्यामुळे आसपासच्या गावात याचे हादरे बसतात.

Advertisements

वेकोली कंपनीकडून कोळसा काढण्यासाठी अशाच प्रकारचे ब्लास्टिंग करण्यात आले होते. या ब्लास्टिंगमुळे कांदरी-कन्हान परिसरातील झोपडी वजा घर कोसळले. घराचा भाग अंगावर पडल्यामुळे या घटनेत वडील आणि मुलगी गंभीर जखमी झाले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कमलेश गजानन कोटेकर आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी यादवी कोटेकर या बाप-लेकीचा मृत्यू झाला.

सुदैवाने या घटनेत कोटेकर यांची पत्नी थोडक्यात बचावली आहे. घरातील कर्ताव्यक्ती आणि मुलगी गेल्यामुळे कोटेकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर कांदरी-कन्हान येथील गावकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी या परिसरातील वेकोली कंपनीकडून होणारी ब्लास्टिंग बंद करावी अशी मागणी केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *