Breaking News

नजरचुकीने गुन्हे नमूद केले नाही : देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाचा मोठा दिलासा

Advertisements

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल याचिकेवर नागपूर न्यायालयाने फडणवीस यांना निर्दोष ठरवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. केवळ निकालाचे वाचन बाकी होते. 2014 मधील निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची नोंद केली नव्हती. या विरोधात वकील सतीश उके यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला आहे.

Advertisements

नेमके प्रकरण काय?

Advertisements

देवेंद्र फडणवीस हे नगरसेवक असताना त्यांनी एका सरकारी वकिलाविरुद्ध काही तक्रारी केल्या होत्या. त्यांना त्या खटल्यातून दूर करावे, अशी मागणी करणारे एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढले होते. त्यावर त्या वकिलाने ‘क्रिमिनल डिफेमेशन’ दाखल केले. नंतर त्याच वकिलांनी ते परत घेतले. या प्रकरणाची नोंद देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात केली नव्हती. यावर आक्षेप घेत वकील सतिश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यात आणखी एका प्रकरणाचाही समावेश आहे. यातील दुसरे प्रकरण एका झोपडपट्टीवासियांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे आहे. एका जागेवर असलेल्या झोपडपट्टीला मालमत्ता कर लावावा, असे पत्र फडणवीस यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत मालकाला मालमत्ता कर देखील लावला. ती जमीन खासगी असून आपल्या मालकीची आहे, अशी खासगी तक्रार एका व्यक्तीने केली होती. पुढे ही तक्रार उच्च न्यायालयाने फेटाळली होती.

नजरचुकीने नमूद करायचे राहिले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात हे दोन्ही गुन्हे नमूद केलेले नाही. त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या न्यायालयीन लढाईत हे दोन्ही गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आधीच पूर्ण झाला असून नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी या संदर्भात निकाल सुनावू शकतात. त्यासाठी आधी 5 सप्टेंबर तारीख ठरली होती मात्र, नंतर न्यायालयाने 8 सप्टेंबर तारीख ठरवली होती. त्यानुसार आज न्यायालयाने निकाल दिला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर हायकोर्टाने अधिकाऱ्यांवर का ठोठावला 50 हजारांचा दंड?

वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याला अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंदियामधील …

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *