ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी असून ती ग्राह्य आहे. कुणालाही कुणाचेही आरक्षण लागू होऊ नये, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण, दोन समाजात वाद निर्माण होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विजय वडेट्टीवार काय बोलले हे माहित नाही, पण ओबीसींमध्ये ‘अ’ किंवा ‘ब’ करा हे योग्य नाही. त्यांनी अकलेचे तारे तोडू नये, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ओबीसींमधील आरक्षण हे मंडल आयोग आणि संविधानाप्रमाणे दिले आहे. ओबीसी आरक्षणावर कुणीही आपला हक्का सांगायचा हे योग्य नाही. मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे. वड्डेटीवार यांचा आरक्षणाबाबतचा अभ्यास कमी आहे. गेल्या काही दिवसात ते आरक्षणाबाबत अर्थ नसलेले वक्तव्ये करत आहे. त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडू नये. मराठा समाज किंवा ओबीसीची फसवणूक होऊ नये, यासाठी जबाबदारीने सरकारने निर्णय घ्यावा, असेही बावनकुळे म्हणाले.
आमदारांच्या मतदार संघात कुठली कामे राहिली असतील तर लाभार्थी वंचित राहू नये, त्याला कार्ड अस नाव दिले आहे, ते रिपोर्ट कार्ड नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपूरच्या बँक घोटाळ्यात वकील नेमण्याचे काम सरकार करणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.