Breaking News

मध्य प्रदेशात कोणाची येणार सत्ता : काँग्रेस की भाजपसाठी गोड बातमी

Advertisements

मध्य प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने नुकतेच ७९ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र काँग्रेसने अद्यापही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

Advertisements

राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीबाबत अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. दरम्यान, एका टीव्ही चॅनेलने आपला ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे.

Advertisements

नव्या सर्वेक्षण अहवालानुसार, आज मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपला १०२ ते ११० जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ११८ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी इतर पक्षांना ०२ जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये जर आपण सर्वेक्षणातील मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर २०२३ च्या निवडणुकीत भाजपला ४२.८ टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला ४३.८ टक्के मते मिळत आहेत. तर इतरांना १३.४० टक्के मते मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

यातच भाजपने आतापर्यंत मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी ७८ जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ९ खासदारांना उमेदवारी दिली. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, फग्गन सिंग कुलस्ते, प्रल्हाद सिंग पटेल, गणेश सिंग, राकेश सिंग, रीती पाठक आणि खासदार उदय प्रताप सिंग यांचा समावेश आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनाही रिंगणात उतरवण्यात आले आहे. कैलाश विजयवर्गीय इंदूर-१ मधून निवडणूक लढवणार आहेत.

२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे झाले तर भाजपला ५६ जागांचे नुकसान होऊन एकूण १०९ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला एकूण ११४ जागा मिळाल्या होत्या. तर बसपाला दोन जागा मिळाल्या.

त्यावेळी काँग्रेस तब्बल १५ वर्षांनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आणि सुमारे दीड वर्ष सत्तेत राहिला. त्यानंतरच्या उलथापालथींमुळे भाजप पुन्हा सत्तेत आला. ज्यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांची मोठी भूमिका होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *