Breaking News

नागपुरात पुन्हा येणार धडकी भरवणारा पाऊस? वाचा

Advertisements

कोकण विभागात ऑरेंज अलर्ट

Advertisements

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार आहेत. हवामान विभागाकडून कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Advertisements

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट), रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात (यलो अलर्ट) आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नागपूरसह काही  ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

2 ऑक्टोबर नंतर कडक सूर्यदर्शन होणार आहे. अर्थातच ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. परंतु राज्यातील काही भागात 5, 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच 5 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, उदगीर, लातूर या भागात थोड्या प्रमाणात पाऊस बरसणार असे मत हवामान तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र या कालावधीमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. परंतु नवरात्र उत्सवाच्या काळात पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यात पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.

तर,यंदा नवरात्र उत्सवाला 15 ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी अर्थातच विजयादशमीच्या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान या नऊ दिवसांच्या काळात यंदा जोरदार पाऊस पडू शकतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *