भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नागपुरात होणार टी-20 सामना : वाचा

वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव मिळाला. मात्र हे दोन्ही संघ 2 दिवसांनी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. त्यापैकी एक सामना नागपुरात होईल. उभय संघांचे लक्ष्य आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर असेल.

भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेचे वेळापत्रक (IND vs AUS T20 Series)
टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेची तयारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेपासून सुरू करेल. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून भारतात खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये तर तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल. यानंतर चौथा टी-20 सामना 1 डिसेंबरला नागपुरात तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

भारतीय संघात युवा खेळाडूंना मिळणार संधी?

2023 च्या वनडे विश्वचषकाचा भाग असलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. हार्दिक पंड्याही दुखापतीशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया या मालिकेत नव्या कर्णधारासह मैदानात उतरू शकते. या संघात एशियन गेम्समध्ये चांगली कामगिरी केलेल्या यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने या मालिकेसाठी आधीच आपला संघ जाहीर केला आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *