Breaking News

दारू, गांझा, सिगारेटच्या नशेत अडकली कॉलेज तरुणाई

नागपूरसह राज्यात कॉलेज विध्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. यात ‘एमडी’ची सवय अनेक तरुण -तरुणीमध्ये दिसत आहे. गोव्यात या सर्व वाईट सवयीवर सरकारचे लक्ष आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार कधी लक्ष देणार आणि या वाईट सवयपासून तरुणाईला कसे दूर ठेवणार? हा प्रश्न कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘वाईन’ या शब्दाभोवती सारा महाराष्ट्र फिरतो आहे. वाईन ही अस्सल दारू नसली तरी मदिरेच्या वाटेवरचा तो टप्पा आहे. मात्र अशा नशेच्या आहारी जाणाऱ्या, अनेक आयुष्य, संसार उद्ध्वस्त करणाऱ्या, पिढ्यानपिढ्या बरबाद करणाऱ्या आणि नव्या पिढीलाही गिळंकृत करणाऱ्या व्यसनाधीनतेकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाहीये, ही खंत आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करत असताना मला हे भीषण चित्र रोज दिसते आहे. आणि याची बाधा फक्त व्यसन करणाऱ्यालाच नाही, तर अप्रत्यक्षपणे त्याच्या कुटुंबाला, मित्र परिवाराला आणि संपूर्ण गावाला होते, हे चिंताजनक आहे. दारूप्रमाणे तंबाखू/गुटख्याचे व्यसनही फार बोकाळले आहे.

जगातील सर्वांत जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे, कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहेत. हा युवावर्ग विवेकी, निरोगी, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त आणि सुदृढ असणे, हीच देशाची खरी ताकद आणि यश असते. परंतु भारतात विचित्र स्थिती पाहावयास मिळते आहे. किशोरवयीनांपासून ते युवकांपर्यंतचे सर्वच गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर पचापचा थुंकताना दिसतात. अशी ही युवा पिढी देशाचे भवितव्य कसे ठरू शकेल?

मादक पदार्थांच्या नशेच्या आहारी जाणारी युवापिढी पाहिल्यास भयावह स्थिती समोर येते. कोकणात गिरणी कामगारांच्या संपानंतर या तरुणांच्या वाताहतीला सुरुवात झाली, ती अद्याप सुरूच आहे. बेकारी, हाताला काम नाही, रोजगार नाही म्हणून दारिद्र्य आले. दारिद्र्यातून नैराश्य आणि नैराश्य घालवण्यासाठी तंबाखूजन्य व मादक पदार्थांचे सेवन हे दुष्टचक्र सुरू झाले. त्यात ही तरुणाई अडकली आहे. बाप व्यसनाधीन झाला, पुढे मुलाने व नातवानेही तोच कित्ता गिरवला, अशी शेकडो कुटुंबे मी पाहिली आहेत.

१९९९ साली शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागले. पण याबरोबरच व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढले आहे. पर्यटनाच्या नावाने गाव तेथे दारू दुकाने, बिअर शॉपी सुरू झाले. प्रत्येक गावात पर्यटक येतातच असे नाही. पण गावातील तरुणाई मात्र या मादक पेयाचा आस्वाद घेऊन झोकांड्या खात आहे. पर्यटनस्थळावर भल्या माणसांची जाण्याची सोयच उरली नाही. रिकाम्या दारूच्या बाटल्या, गुटख्याची रिकामी पाकिटे यांच्या कचऱ्याने व्यसनाधीन संस्कृतीचे चित्र पर्यटकांच्या दृष्टीस पडते.

एकूणच दारू, गुटका, तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. एकाने याचा आस्वाद घेतला, त्याला दुसरा येऊन मिळाला, नंतर तिसरा, चौथा, पाचवा… अशी संख्या वाढत जाऊन समूहाने एकत्र येऊन मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या ठिकाणाला गावात ‘पागलनाका’ संबोधले जाते. अशा पागलनाक्यांची ठिकाणे गावोगावी पाहावयास मिळतात.

पर्यटनस्थळ, सागर किनारा आणि सागरी मार्गामुळे जिल्ह्यात अमली पदार्थांचा व्यापार बिनबोभाट सुरू आहे. या अनैतिक धंद्यात आणि मादक पदार्थांच्या विळख्यात सापडणार्‍या तरुणांची संख्याही मोठी आहे. याचा परिणाम जीवनशैली बदलली आणि अनावश्यक गरजा वाढल्या. त्या पूर्ण करण्यासाठी चोरी, दरोडा, खून, मारामाऱ्या व्हायला लागल्या. या सगळ्यामुळे वातावरण गढूळ झाले. त्या पार्श्वभूमीवर भान हरपून नशेच्या धुंदीत जगणारी तरुणाई दृष्टीस पडते, तेव्हा मन खिन्न होतं!

तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल, तर दिशादर्शक विकासात्मक उपक्रम राबवले पाहिजेत…
पडघम – राज्यकारण
अर्पिता मुंबरकर
प्रातिनिधिक चित्र
Sat , 26 February 2022
पडघमराज्यकारणदारूबंदीDaru BandiदारूAlcoholवाईनWineव्यसनाधिनताAddictionतरुणYouthकरोना विषाणूCorona virusकरोना-१९Corona-19
गेल्या काही दिवसांपासून ‘वाईन’ या शब्दाभोवती सारा महाराष्ट्र फिरतो आहे. वाईन ही अस्सल दारू नसली तरी मदिरेच्या वाटेवरचा तो टप्पा आहे. मात्र अशा नशेच्या आहारी जाणाऱ्या, अनेक आयुष्य, संसार उद्ध्वस्त करणाऱ्या, पिढ्यानपिढ्या बरबाद करणाऱ्या आणि नव्या पिढीलाही गिळंकृत करणाऱ्या व्यसनाधीनतेकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाहीये, ही खंत आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करत असताना मला हे भीषण चित्र रोज दिसते आहे. आणि याची बाधा फक्त व्यसन करणाऱ्यालाच नाही, तर अप्रत्यक्षपणे त्याच्या कुटुंबाला, मित्र परिवाराला आणि संपूर्ण गावाला होते, हे चिंताजनक आहे. दारूप्रमाणे तंबाखू/गुटख्याचे व्यसनही फार बोकाळले आहे.

जगातील सर्वांत जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे, कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहेत. हा युवावर्ग विवेकी, निरोगी, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त आणि सुदृढ असणे, हीच देशाची खरी ताकद आणि यश असते. परंतु भारतात विचित्र स्थिती पाहावयास मिळते आहे. किशोरवयीनांपासून ते युवकांपर्यंतचे सर्वच गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर पचापचा थुंकताना दिसतात. अशी ही युवा पिढी देशाचे भवितव्य कसे ठरू शकेल?

मादक पदार्थांच्या नशेच्या आहारी जाणारी युवापिढी पाहिल्यास भयावह स्थिती समोर येते. कोकणात गिरणी कामगारांच्या संपानंतर या तरुणांच्या वाताहतीला सुरुवात झाली, ती अद्याप सुरूच आहे. बेकारी, हाताला काम नाही, रोजगार नाही म्हणून दारिद्र्य आले. दारिद्र्यातून नैराश्य आणि नैराश्य घालवण्यासाठी तंबाखूजन्य व मादक पदार्थांचे सेवन हे दुष्टचक्र सुरू झाले. त्यात ही तरुणाई अडकली आहे. बाप व्यसनाधीन झाला, पुढे मुलाने व नातवानेही तोच कित्ता गिरवला, अशी शेकडो कुटुंबे मी पाहिली आहेत.

१९९९ साली शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागले. पण याबरोबरच व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढले आहे. पर्यटनाच्या नावाने गाव तेथे दारू दुकाने, बिअर शॉपी सुरू झाले. प्रत्येक गावात पर्यटक येतातच असे नाही. पण गावातील तरुणाई मात्र या मादक पेयाचा आस्वाद घेऊन झोकांड्या खात आहे. पर्यटनस्थळावर भल्या माणसांची जाण्याची सोयच उरली नाही. रिकाम्या दारूच्या बाटल्या, गुटख्याची रिकामी पाकिटे यांच्या कचऱ्याने व्यसनाधीन संस्कृतीचे चित्र पर्यटकांच्या दृष्टीस पडते.

एकूणच दारू, गुटका, तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. एकाने याचा आस्वाद घेतला, त्याला दुसरा येऊन मिळाला, नंतर तिसरा, चौथा, पाचवा… अशी संख्या वाढत जाऊन समूहाने एकत्र येऊन मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या ठिकाणाला गावात ‘पागलनाका’ संबोधले जाते. अशा पागलनाक्यांची ठिकाणे गावोगावी पाहावयास मिळतात.

पर्यटनस्थळ, सागर किनारा आणि सागरी मार्गामुळे जिल्ह्यात अमली पदार्थांचा व्यापार बिनबोभाट सुरू आहे. या अनैतिक धंद्यात आणि मादक पदार्थांच्या विळख्यात सापडणार्‍या तरुणांची संख्याही मोठी आहे. याचा परिणाम जीवनशैली बदलली आणि अनावश्यक गरजा वाढल्या. त्या पूर्ण करण्यासाठी चोरी, दरोडा, खून, मारामाऱ्या व्हायला लागल्या. या सगळ्यामुळे वातावरण गढूळ झाले. त्या पार्श्वभूमीवर भान हरपून नशेच्या धुंदीत जगणारी तरुणाई दृष्टीस पडते, तेव्हा मन खिन्न होतं!

आज-काल निरनिराळ्या सण-समारंभातून उदरारणार्थ दहीहंडी, नेत्यांचे वाढदिवस, मिरवणुका, ३१ डिसेंबर, लग्न, हळदी समारंभ, वाढदिवस, पुढाऱ्यांच्या मिरवणुका अशा प्रसंगी आयोजित केल्या जाणाऱ्या मद्य पार्ट्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा मिळत आहे.

खोटी आश्वासने देणाऱ्या राजकारण्यांच्या थापांच्या नादी लागून या तरुणांना व्यसनांच्या विळख्यात ढकलण्यासाठी पुढाऱ्यांची चढाओढ लागलेली असते. व्यसनासाठी कोणतेही काम करायला तरुण तयार होतात. व्यसनांना घातक न मानता उलट ती सन्मानाची बाब आहे, असे मानण्याचे मूल्य समाजात रुजले आहे.

अवैध मार्गाने आलेल्या दारू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ वापरात येत आहेत. त्यांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला फुप्फुसाचे, किडनीचे, आतड्याचे, तसेच लिव्हर निकामी होण्याच्या रोगांनी ग्रासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार व्यसनांच्या आहारी जाऊन मृत्यू ओढवलेल्यांची संख्या दरवर्षी १५ लाख इतकी आहे. यात १८ ते ३५ या वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. कोकणातही अशा मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. पर्यटन जिल्हा होण्याचे हे एक फलित आहे. पण जिल्ह्यात कोठेही व्यसनमुक्ती केंद्राची सोय नाही. जिल्ह्याबाहेर सातारा किंवा पुणे येथे व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचे तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो. तो परवडणारा नसतो. काही मोजक्या व्यक्तींना त्यांच्या आर्थिक सुबत्तेमुळे तिथे जाता येते. उर्वरित तरुणांना व्यसनांनी ग्रासलेल्या आजारातून मुक्ती मिळते मृत्यूनेच!

शाळेच्या आवारात, परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा कायदा २००३3 लागू झाला असूनही शाळा कॉलेज परिसरात गुटखा, मावा आणि तंबाखूजन्य पदार्थ सहज मिळतात. याचा परिणाम शालेय मुलांवर होताना दिसतो अनेक शाळांच्या परिसरात गुटख्याच्या पाकिटांचा मोठ्या प्रमाणात कचरा दिसत असतो. याशिवाय बेकायदा दारू आणि गुटखा थांबवण्यास शासनाचे नाकर्तेपण दिसून येते. अवैध दारू विरोधी समित्या तालुकानिहाय स्थापन्याचे परिपत्रक गृहखात्याने २००४मध्ये काढले होते, पण अद्याप कुठेही अशा समित्या स्थापन झालेल्या दिसत नाहीत.

या व्यसनांचा परिणाम स्त्रियांवर होताना दिसतो. पुरुष व्यसन करतात, पण परिणाम बाईला भोगावे लागतात. सुरुवातीला नवरा दारू पिऊन मारतो, नंतर मुलगा व नातूही तेच करतो. घरी बायकोला आणि मुलांनासुद्धा बाप दारू पिऊन मारझोड करतो. नवरा तर मारतो, पण पुढे मुलगाही वडिलांचे अनुकरण करतो. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे सातत्य टिकून राहते. बाईने हे असेच सहन करत जगावे, असा पारंपरिक समज आहेच.

तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता कमी करायची असेल, तर दिशादर्शक विकासात्मक उपक्रम राबवले पाहिजेत. तरुणांची मोठी संख्या असलेल्या देशात या तरुणांसाठी देशाच्या, राज्याच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पात, नियोजनात कोणतीही तरतूद नाही. गावागावातून तरुण मंडळे अस्तित्वात आहेत, पण एखाद्या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करणे, सत्यनारायणाच्या पूजेचा उत्सव करणे आणि क्रिकेटच्या मॅच भरवणे, इतक्यापुरतेच या तरुण मंडळांचे अस्तित्व!

स्वातंत्र्य चळवळीनंतर तरुणांसाठी कोणतेही दिशादर्शक उपक्रम झाले नाहीत. पोपटराव पवार, पेरे पाटील यांच्यासारखे नेतृत्व सिद्ध करून विधायक कार्य करणाऱ्या व्यक्ती तयार करावयाच्या असतील तर बाबा आमटेंच्या छावणीसारखे उपक्रम गावागावातून राबवले गेले पाहिजेत. शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी, स्वयंसेवी संस्था-संघटनांनी तरुणांसाठी एककलमी ‘गाव विकासात तरुणांचा सहभाग’ हा कार्यक्रम राबवल्यास तरुणांची ऊर्जा आणि वाढता उत्साह गावाच्या विकासासाठी विधायक कामासाठी वापरता येऊ शकतो.

पण इथे तर देश चालवायला, राज्य चालवायला नशेच्या पदार्थांच्या उत्पन्नाचा आधार घ्यावा लागतो. आज वाईन उपलब्ध करून देतील, उद्या आणखी दुसरे काही! हीच खरी शोकांतिका आहे. एका दारुड्या नवऱ्याची बायको म्हणते- ‘दारू पिऊन महिलांना मारझोड करणाऱ्या समाजाकडून देशाच्या अर्थव्यवस्थेत काय भर पडणार आहे?’

नवऱ्याच्या मारामुळे, छळामुळे आमच्या व आमच्या मुलाबाळांच्या डोळ्यातून निघणाऱ्या आसवांवर देशाची अर्थव्यवस्था उभी करायची असेल, तर अजून किती वर्षे आम्हाला हे सहन करावे लागणार?

About विश्व भारत

Check Also

दुनिया का सबसे बडा स्वयं सेवी संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

दुनिया का सबसे बडा स्वयं सेवी संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

रामलला प्राण प्रतिष्ठा करने वाले 86 वर्षीय मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित का निधन

रामलला प्राण प्रतिष्ठा करने वाले 86 वर्षीय मुख्य पुजारी पं लक्ष्मीकांत दीक्षित का निधन टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *