Breaking News

PM मोदींना कोणती भाजी आवडते?आरोग्यासाठी फायदेशीर

Advertisements

भारत देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करावा. अनेक फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगले असतात; ज्यात शेवग्याच्या शेंगांचादेखील समावेश आहे. अनेकजण शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शेवगा आरोग्यासाठी अमृत मानला जातो आणि सध्या तर शेवग्याच्या पराठ्याचीही खास चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी फिट इंडिया मोहिमेनिमत्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण शेवग्याचे पराठे खातो, असे आवर्जून सांगितले होते. पुन्हा तो जुना व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला.

Advertisements

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आहाराचा एक भाग म्हणून शेवग्याच्या पराठ्यांचा उल्लेख केला आहे, तेव्हापासून शेवग्याच्या शेंगाकडे लक्ष वेधले आहे, विशेषत: वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचं भाग म्हणून या शेंगांकडे पाहिले जात आहे. पण, या शेंगांचे फायदे फारच कमी लोकांना माहीत असतात. शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे. कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमिनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. शेवग्याच्या शेंगांना सुपरफूडही म्हटले जाते.

Advertisements

शेवग्याच्या केवळ शेंगाच नाही, तर याच्या पानांचादेखील भाजीसाठी वापर केला जातो. त्याच्या पानातदेखील अनेक पौष्टिक घटक आढळतात. शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. लठ्ठपणा आणि अतिरिक्त साठलेली चरबी कमी करण्यास याची मदत होते, असे सांगितले जाते. आता याच विषयावर अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियांका रोहतगी यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.

डॉ. म्हणतात, प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही गुणधर्म असतात. त्यातीलच एक म्हणजे शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व आहेत. शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे. चव आणि पौष्टिकतेने समृद्ध शेवगा हे केवळ आरोग्यदायी अन्नच नाही तर त्याची फुले, पाने आणि फळे खूप फायदेशीर आहेत. याच्या नियमित सेवनाने माणूस नेहमी तंदुरुस्त राहतो, असे त्या सांगतात.

शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो. अनेक अभ्यासामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ड्रमस्टिकच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट क्लोरोजेनिक अॅसिड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या पाल्यात दाह कमी करणारे गुण असतात, त्यामुळे मधुमेहींनी या पाल्याचे सेवन करावे.

खरंतर वजन कमी करण्यासाठी शेवग्याला निसर्गाचे वरदान म्हटले जाते. शेवग्याच्या पाल्यात क आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. शेवग्याच्या शेंगाच्या झाडामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. ही जीवनसत्त्वे अँटीऑक्सिडंटचे काम करतात. शेवग्याच्या पाल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. या पाल्यामुळे त्वचेत नव्या पेशींची निर्मिती व्हायला मदत होते, अधिक कॅलरी बर्न करू शकते व पचनक्रिया सुधारते.

डॉक्टर सांगतात, खरंतर शेवग्याची भाजी खाणं हे वजन कमी करण्यासाठी काही जादुई उपाय नाही. म्हणून वजन कमी करण्यासाठी सावधपणे त्याचा वापर करणे आवश्यक आहे. तुम्हाला मधुमेह असल्यास, नेहमी तुमच्या डॉक्टरांशी त्याच्या सेवनाबद्दल चर्चा करा. आहारातील महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी किंवा पूरक आहार वापरण्यापूर्वी आरोग्यसेवा तज्ज्ञाचा सल्ला घ्या. वजन कमी करणे हे नेहमीच आहार, व्यायाम, झोप आणि जीवनशैलीतील बदल यावरही अवलंबून असते, असेही डॉ. रोहतगी नमूद करतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर होने लगेगा!

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर …

आयुर्वेद के अनुसार जितनी लंबी उम्र, उतना अधिक आक्सीजन देता है पाकड़,फल पेड

आयुर्वेद के अनुसार जितनी लंबी उम्र, उतना अधिक आक्सीजन देता है पाकड़,फल पेड टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *